Home »National »Delhi» Salman Khurshid Will Act In Play

पंतप्रधान, राष्ट्रपतींसमोर सलमान खुर्शिद करणार ‘वादग्रस्त’ नाटक

वृत्तसंस्‍था | Oct 24, 2011, 13:45 PM IST

  • पंतप्रधान, राष्ट्रपतींसमोर सलमान खुर्शिद करणार ‘वादग्रस्त’ नाटक

नवी दिल्ली -रामलीला मैदानावरील अण्णा हजारेंचे उपोषण सोडवण्यात महत्वाची भूमिका निभावणा-या केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शिद आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. सलमान खुर्शिद आता आपल्यातील ‘छुपी कला’ पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यासमोर सादरकरतील.
२८ ऑक्टोबरला राष्ट्रपती भवनमध्ये ‘सन्स ऑफ बाबर’ नावाचे वादग्रस्त ठरलेले नाटक सादर होणार आहे. या नाटकात सलमान खुर्शिद अभिनेत्याच्या रूपात नाटय जगतात पाऊल ठेवणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे खुर्शिद यांनीच ‘सन्स ऑफ बाबर’ नाटक लिहिले आहे. कंपनी व्यवहार मंत्री असताना त्यांनी सन २००८ मध्ये १२१ पानांचे नाटक लिहिले होते. हे नाटक इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेमध्ये उपलब्ध आहे.
'
या नाटकाच्या माध्यमातून बहादूर शहा जाफर या देशभक्त राजाला बाबराच्या पंक्तीत बसविले गेले आहे. भारतावर आक्रमण करणाऱ्या बाबर या
क्रूरराजाचे सलमान खुर्शीद यांनी उदात्तीकरण केले आहे', असा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे.मे २०११ मध्ये गोव्यात या नाटकाविरोधात मोठे आंदोलन झाले होते.
डॉ. एम. सईद आलम यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. नाटकामध्ये टॉम अल्टर, मदीहा सदफ सारखे नाटय क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार देखील आहेत. मुघल कालखंडातील हे नाटक आहे. १८५७ मधील गदरच्या पार्श्वभूमीवर हे नाटक लिहिले आहे. यामध्ये बहादूर शहा जफर नायक आहे. त्याच्याभोवतीच नाटक फिरते. टॉम अल्टरने बहादूर शहाची भूमिका निभावली आहे. नाटकात एकूण २० कलाकरांनी भाग घेतला आहे.
दिग्दर्शक सईद आलम यांनी म्हटले आहे की भारतातील काही मुसलमानांची ओळख पुसत चालली आहे, ही गोष्ट नाटकातून पुढे आणण्यात आली आहे.

आपले मत
राजकीय नेत्यांनी पाश्च्यात्य राजकारण्यांचे अनुकरण करीत अभिनय क्षेत्रात यावे का ? सलमान खुर्शीद यांनी
लिहिलेल्या या नाटकाबद्दल तुम्हास काय वाटते ?Next Article

Recommended