आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान रश्दी यांचा कोलकाता दौरा रद्द

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांना स्थानिकांकडून होणारा विरोध सुरक्षेच्या कारणास्तव कोलकाता दौरा रद्द करावा लागला आहे. दीपा मेहता यांचा चित्रपट ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’च्या प्रमोशनल कार्यक्रमात भाग घेण्यासाठी रश्दी येथे येणार होते. हा चित्रपट रश्दींच्या कादंबरीवर आधरित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपा मेहता यांनीदेखील त्यांचा दौरा रद्द केला आहे.

सलमान रश्दी सध्या भारतात असून ते कोलकाता येथे येणार असल्याने शेकडो लोकांनी रश्दींना विरोध करण्याची तयारी केली होती. रश्दी विमानतळावर येणार असल्याने हजारो लोक हातात काळे झेंडे, बॅनर्स घऊन बुधवारी विमानतळावर जमले होते. हा प्रकार समजल्यावर रश्दींनी शेवटच्या क्षणी कोलकाता दौरा रद्द करून टाकला. दीपा मेहता यांच्या ‘मिडनाइट चिल्ड्रन’ या चित्रपटाची कथा व पटकथा रश्दी यांनी लिहिली असून आवाजही दिला आहे. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.

रश्दी येणार असल्याची सूचना आम्हाला आधी मिळालेली नव्हती. आम्हाला याबाबत काहीच माहीत नाही.’
जावेद शमीम, सहपोलिस आयुक्त, कोलकाता
प. बंगालमध्ये रश्दींवर लावण्यात आलेल्या बंदीचा निषेध करते. 2007 पासून माझ्यावर लावण्यात आलेल्या बंदीचाही मी निषेध करते.’
तस्लिमा नसरीन, लेखिका