आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपाकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब्लेट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - समाजवादी पार्टीने शुक्रवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी पारंपरिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुस्लिमांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. याबरोबर इंग्रजी आणि संगणकविरोधी छबी बदलण्याचा प्रयत्न करत सपाने दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संगणक आणि टॅबलेट पीसी देण्याची घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य विरोधी पक्ष सपाने अत्यावश्यक प्रसंगीच भूसंपादन करण्याचे आश्वासन दिले आहे. सपा प्रमुख मुलायमसिंह यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यातील मतभेद जाहीरनाम्यामध्ये उघड झाले आहेत. यामध्ये गेल्या पाच वर्षांतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.