आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Joshi Claims Threat To Life; Writes To Chidambaram Demanding Security

संजय जोशींना जीवे मारण्याची धमकी; गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे राजकारणातील सर्वात मोठे शत्रू मानण्यात येणारे संजय जोशी यांना वारंवार फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते संजय जोशी यांनी या संदर्भात गृहमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहले आहे की, त्यांना वारंवार फोनवर मारून टाकण्याच्या धमक्या मिळत आहेत. संजय जोशी यांनी गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. पत्रामध्ये त्यांनी त्या फोन नंबरचाही उल्लेख केला आहे, ज्यावरून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
मागील काही दिवसांपासून मोदी आणि संजय जोशी यांच्यातील वाद सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री मोदी यांनी मे महिन्यामध्ये मुंबईत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने जोशी यांना चांगलेच कोंडीत पकडले. जोशी कार्यकारिणीच्या बैठकीला येणार असतील तर आपण त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशी धमकी मोदींनी दिली होती. त्याची धास्ती घेऊन गडकरींनी जोशींचा राजीनामा घेतला होता.
नरेंद्र मोदी-संजय जोशी पोस्टरयुद्ध मुंबईतही
जोशी - केशुभाई मोदींविरोधात एकत्र?
संजय जोशी यांचा भाजपच्या उत्तर प्रदेश प्रभारी पदाचा राजीनामा