आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanjay Joshi Supporters Begins Poster War Against Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संजय जोशी समर्थकांची मोदींविरोधात पोस्‍टरबाजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद/नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांच्यावरून भाजपमध्ये उसळलेला वाद आता रस्त्यावर आला आहे. पक्ष कार्यकारिणीतून राजीनामा देऊन बाहेर पडलेले संजय जोशी यांच्या समर्थकांनी दिल्लीपर्यंत पोस्टरबाजी सुरू केली असून यात मोदींना अप्रत्यक्ष ‘टार्गेट’ केले आहे. भाजप कार्यालये व नेत्यांच्या घरांसमोर बहुतांश पोस्टर लावण्यात आले आहेत. याचा गवगवा झाल्यानंतर पोस्टर्स काढून टाकली. सोमवारी रात्री अहमदाबादेत भाजपच्या मुख्यालयाजवळच पहिले पोस्टर दिसले. पक्षाचे नेते अरुण जेटली, मुरली मनोहर जोशी यांच्या निवासस्थानांबाहेर अशीच पोस्टर्स लावण्यात आली होती.

- पहिले पोस्टर : कोत्या मनाचा माणूस मोठा नेता होऊ शकत नाही, भंगलेल्या मनाची माणसे पुन्हा उभी राहू शकत नाहीत... कहो दिल से... संजय जोशी फिर से...
- दुसरे पोस्टर : एकाला खुश करायचे, दुस-याचा राजीनामा मागायचा, हेच का भाजपचे धोरण? भाजपा की क्या मजबूरी... नहीं चलेगी दादागीरी...

मोदी राजवटीपेक्षा आणीबाणी बरी!
संजय जोशींचा राजीनामा नरेंद्र मोदी हजर