आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarabjeet Singh Is A Victim Of Dirty Politics In Pakistan

...तर सरबजि‍त आज मुक्त असताः वकील ओवैस शेख यांनी मांडले पुस्‍तकातून सत्‍य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड- पाकिस्‍तानच्‍या तुरुंगात गेल्‍या 19 वर्षांपासून कैदेत असलेला सरबजि‍त सिंग आज मुक्त झाला असता. परंतु, तो राजकारणाचा बळी ठरला, असा दावा त्‍याच्‍या वकीलांनी केला आहे. सरबजि‍तच्‍या वतीने बाजू मांडणारे वकील ओवैस शेख यांनी हे सांगतानाच त्‍याच्‍या खटल्‍यातील अनेक त्रुटी सांगितल्या. ओवैस शेख यांनी दैनिक भास्‍करच्‍या कार्यालयाला भेट दिली. त्‍यावेळी त्‍यांनी सरबजि‍तचा सध्‍याचा फोटो दाखविला.

ओवैस शेख हे चंदीगडमध्‍ये एका पुस्‍तक प्रकाशनाला प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित होते. त्‍यावेळी ते म्‍हणाले, सरबजि‍तविरुद्ध 3 खटले होते. सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केलेल्‍या रिव्‍ह्यू पीटीशनमध्‍ये विशेष न्‍यायाधीशांसमोर त्‍याने नोंदविलेले जबाब सादर करण्‍यात आले नाही. त्‍याचा जबाब 3 ऑक्‍टोबर 1991 रोजी नोंदविण्‍यात आले होते. ते या खटल्‍याची दिशा बदलू शकले असते. सरबजि‍तचा कबुलीजबाब कोणत्‍याही खटल्‍यात घेण्‍यात आला नाही. त्‍याला विचारण्‍यात आलेल्‍या प्रश्‍नांवरुन हे स्‍पष्‍ट होते की, त्‍याच्‍यावर गुन्‍हा कबूल करण्‍यासाठी दबाव आणण्‍यात आला होता.

(फोटोः उजवीकडे सरबजितचा जुना फोटो आहे. तर चष्‍मा घालून असलेला त्‍याचा सध्‍याचा फोटो आहे.)