आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये सरबजीतच्या जीवाला धोका; सोनियांना पाठवले पत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर- 'पाकमध्ये आपल्या जीवाला धोका आहे', असे पाकिस्तानमधील तुरुंगात शिक्षा भोगत असलेला भारतीय कैदी सरबजीत सिंग ‍याने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र पाठवून कळवले आहे. सरबजीत सिंगला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून तो सध्या लाहोरमधील कोट लखपत येथील तरुंगात बंदीस्त आहे.
तरुंगातील अधिकारी त्याला निकृष्ट दर्जाचे जेवण देतात. तसेच त्याला तेथे चांगला वागणूक मिळत नाही. शाररीक आणि मानसिक शोषण होत आहे, सरबजीतने पत्रात म्हटले आहे. सरबजीतने सोनिया गांधी, बहीण दलबीर कौर आणि मुलगी पूनम यांना तीन वेगवेगळे पत्र पाठविले आहे.
पाकमधील तरुंगात अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवन मिळत असल्याने दिवसेंदिवस आपली तब्बेत खालावत चालली आहे. येथे दवाखाण्याची व्यवस्था नाही. पायाला दुखापत झाली असल्याचे सरबजीतने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. सरबजीतने आपल्या मुलीला चांगला अभ्यास करण्‍यास सांगितले आहे.
'मला माझ्या कुटुंबियांची भेट घ्यायची आहे. त्यांचा व्हीसा मंजूर करून देण्यासाठी पाकिस्तान सरकारकडे शिफारस करावी', अशी विनंती
सरबजीतने सोनिया गांधीकडे केली आहे.
सरबजीतची फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी त्याचे वकील अवैस शेख यांनी नुकतील पाकिस्तानचे राष्‍ट्रपती यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे. सरबजीतला कमीतकमी शिक्षा व्हावी, असे शेख यांनी त्यात म्हटले आहे. शेख यांनीच सरबजीतने दिलेले पत्रे भारतात आणले आहे.
सरबजीत खटल्याची सुनावणी २० सप्टेंबरपर्यंत स्थगित
सरबजीत सिंगची लाहोर उच्‍च न्यायालयात याचिका