आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शताब्दी, दुरांतो प्रवास 20 रुपयांनी महागणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानी, शताब्दी आणि दुरांतोसारख्या प्रमुख रेल्वेगाड्यांच्या भाड्यात 15 ते 20 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. या ‘प्रीमियर’ रेल्वेगाड्यांतील केटरिंग सेवेच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. सॉफ्टवेअर अद्ययावत झाल्यानंतर सुधारित दर जाहीर होतील, अशी माहिती निर्णयप्रक्रियेत असलेल्या एका अधिका-या ने दिली.

विशेष म्हणजे गेल्या 22 जानेवारीला रेल्वेच्या प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली होती. दहा वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या महिन्यात मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांतील
खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर वाढवण्यात आले होते. मात्र त्यात राजधानी, शताब्दी आणि दुरांतोचा समावेश नव्हता. या गाड्यांत प्रवाशांना देण्यात येणारे जेवण आणि अल्पोपाहाराचे शुल्क तिकिटातच समाविष्ट असते.

रेल्वेगाड्यांतील मेन्यू व भाडेवाढीबाबत सल्ला देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष समितीची स्थापना केली होती. समितीच्या शिफारशी व रेल्वे बोर्डाच्या सल्ल्यांवरून शुल्कात सुधारणेचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिका-या ने सांगितले.