आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आमिर खानच्या शो 'सत्यमेव जयते'च्या प्रत्येक भागाची दर्शकांकडून आतुरतेने वाट पाहिली जाते. प्रत्येकाला शोमध्ये आमिर कोणता नवा सामाजिक मुद्दा उठवणार आहे याची उत्सुकता लागलेली असते.
पहिल्या भागात स्त्री भृण हत्या, दुस-यामध्ये बाललैंगिक शोषण, तिस-यामध्ये हुंडयाची प्रथा आणि चौथ्या भागात देशातील बिघडलेल्या आरोग्य सेवेचा विषय हाताळला होता. यावेळी आमिरने ऑनर किलिंगसारख्या गंभीर विषयास हात घातला.
प्रेमाची शिक्षा भोगलेल्या लोकांना या भागात बोलवण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात आमिरने हलक्या मुडमध्ये केली. यावेळी आमिरने 'इश्क पर जोर नही यह वो आतिश है गालिब, जो लगाये ना लगे बुझाये ना बुझे' ही मिर्झा गालिब यांची शायरी म्हटली. या शायरीद्वारे त्याने प्रेमाचे महत्व सांगितले.
प्रेमाबाबत त्याने आपले मत व्यक्त केले. माझ्या चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्रीवर मला प्रेम होते, आणि मी हे पत्नी किरणला काय करू असे विचारतोदेखील...इश्क पर जोर नही... मला फक्त ही भीती वाटते की किरणही उद्या मला हीच गोष्ट येऊन सांगेन.
रिझवानला प्रेम केल्याची शिक्षा भोगावी लागली. दुस-या जातीतील प्रियंकाशी केलेल्या लग्नामुळे त्याला मरणाच्या दारी पोहोचवण्यात आले. प्रियंकाच्या घरवाल्यांनी रिझवानचा खून केला. अनेक दिवसांपासून गायब असलेल्या रिझवानचा मृतदेह एका जंगलात आढळून आला. शोमध्ये रिझवानच्या नातेवाईकांना आणि आईला बोलवण्यात आले होते. आमिरने यावेळी खाप पंचायतीच्या प्रतिनिधींशीदेखील चर्चा केली.
डॉक्टर बनले यमराजः \'सत्यमेव जयते\'मधुन आमिरने टाकला प्रकाश
\'सत्यमेव जयते\'मधुन यावेळी आमिरने मांडली हुंड्याची समस्या
सत्यमेव जयते : बाल शोषणाच्या तक्रारींचा पाऊस
सत्यमेव जयते मध्ये आमिरने का लपवले \'सत्य\'
आमिरचा सत्यमेव जयते आणि लैंगिक शोषण झालेल्यांचे दुःख (छायाचित्र)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.