आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SC Stays Execution Of Death Sentence Of Veerappan's Aides

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीरप्‍पनच्‍या 4 साथीदारांच्‍या फाशीला स्‍थगिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन याच्या चार सहका-च्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. याप्रकरणी बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे.

घनप्रकाशम, सिमोन, मिसेकर मदैह आणि पिलवेंद्रन अशी त्‍यांची नावे आहेत. सध्या हे आरोपी बेळगाव येथील कारागृहात आहेत. कर्नाटकातील पालार येथे 1993 मध्ये वीरप्पनच्या टोळीने भूसुरुंगाचा स्फोट घडविला होता. यात 22 पोलिस ठार झाले होते. या प्रकरणी 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्‍यानंतर त्‍यांनी राष्‍ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला होता. तो राष्‍ट्रपतींनी फेटाळला. त्‍यानंतर चौघांनी फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळून जन्‍मठेपेत शिक्षा परिवर्तित करावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. तो न्‍यायालयाने स्विकारला.