आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Scam Of Helicopter Purchasing : Conditions Change During The Tyagi\'s Time

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा : त्यागींच्या काळातच शर्तींमध्ये बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वादग्रस्त ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करारातील काही शर्ती हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी यांच्याच कार्यकाळात बदलण्यात आल्या होत्या. मार्च 2005 ते सप्टेंबर 2006 या काळात शर्ती बदलल्यानंतरच ‘ऑगस्टा’ या व्यवहारासाठी पात्र ठरली. तेव्हा त्यागी पदावर होते, असे संरक्षण मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘फॅक्ट शीट’मध्ये नमूद करण्यात आले आहे.

या करारातील शर्ती 2003 मध्येच बदलण्यात आल्या. तेव्हा आपण पदावर नव्हतो. आपल्या कार्यकाळात केवळ टेंडर काढण्यात आल्याचे त्यागी यांनी बुधवारी म्हटले होते. यानंतर संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी ‘फॅक्ट शीट’ जारी केले.
यात हेलिकॉप्टर खरेदी व्यवहाराशी संबंधित इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे.

संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी फिनमेक्कानिका या इटलीच्या कंपनीला पत्र पाठवून या व्यवहारात एखाद्या भारतीयाला किंवा भारतीय कंपनीला लाच दिली गेली आहे का, अशी विचारणा केली आहे. मूळ ऑगस्टा वेस्टलँडची ही भागीदार कंपनी आहे. दरम्यान, सीबीआय पथकाने गुरुवारी संरक्षण मंत्रालयातील सहसचिव दर्जाच्या एका अधिका-यांची भेट घेतली. या व्यवहारासंबंधीची माहिती पथकाने घेतल्याचे समजते.

ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदीत लाच दिली गेल्याचे प्रकरण चर्चेत येताच केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.

करार रद्द, कंपनी ब्लॅक लिस्ट करण्याचीही तयारी?
माजी हवाई दलप्रमुख त्यागी यांच्या काळातच शर्ती बदलल्याचे ‘फॅक्ट शीट’द्वारे सांगणारे केंद्र या प्रकरणात शक्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याच्या तयारीत आहे. यात हा करार रद्द करणे, कंपनीला ब्लॅकलिस्ट करणे किंवा कायदेशीर कारवाईचा पर्याय सरकारसमोर आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हेलिकॉप्टर खरेदीत कथित घोटाळा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर ऑगस्टा कंपनीला विचारणा करण्यात आली. तेव्हा कंपनीने सर्व आरोप निराधार आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले होते, असे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.

असे बदलले निकष
फॅक्ट शीटनुसार मार्च 2002 मध्ये पहिले ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल’ देण्यात आले. यात 18 हजार फुटांवरून उडू शकतील अशा हेलिकॉप्टरची गरज नमूद करण्यात आली. या व्यवहारासाठी देण्यात आलेल्या अटी व शर्तींचा विचार करता इटलीमधील ऑगस्टा वेस्टलँड कंपनी पात्र ठरत नव्हती.सन 2003 मध्ये वाजपेयी सरकारने हे निकष बदलण्याचा सल्ला दिला. माजी सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रांनी बैठक घेऊन शर्ती बदलण्याबाबत चर्चा केली.
मार्च 2005 ते सप्टेंबर 2006 मध्ये तांत्रिक बदल करण्यात आले.