आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Teacher Raped Of A Student And Made Video Clips Mms Rape At Delhi

बलात्कारी शिक्षकाच्या भीतीने तिने सोडले शिक्षण; तरी ब्लॅकमेलिंग थांबले नाही!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याला काळामा फासणारी घटना राजधानीत उघडकीस आली आहे. एका नराधम शिक्षकांने 14 वर्षीय विद्यार्थिनीवर सलग चार वर्षे बलात्कार केला. बलात्कारी ‍शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित विद्यार्थिनीने शिक्षण अर्ध्यात सोडले. तरी या शिक्षकाचे 'कृष्‍णकृत्य' थांबले नाही. तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता.
हौज काजी पोलिसांनी या नराधम शिक्षकाला अटक केली आहे. शैलेंद्र कुमार असे त्याचे नाव आहे. शैलेंद्रने त्याच्या शाळेतील नववीच्या विद्यार्थिनीवर सलग चार वर्षे बलात्कार केला. एवढेच नाही तर तिचा अश्लील व्हिडिओ तयार केला. अखेर शिक्षकाच्या अत्याचाराच्या भीतीने तिने शिक्षण सोडले. परंतु व्हिडिओ क्लिपिंग इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी देऊन तो तिच्यावर बलात्कार करत होता.
पहाडगंज येथील एका लॉजवर तिला जबरदस्तीने नेऊन तो तिच्यावर बलात्कार करत होता. तसेच कॅनॉट प्लेस येथील एका हॉटेलमध्येही त्याने अनेक वेळा तिच्यावर शाररीक अत्याचार केला होता, असे पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले. विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्‍यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहे.
ब्‍ल्‍यू फिल्‍म दाखवून नागपुरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार
अल्पवयीन मुलीवर सलग 20 दिवस सामुहीक बलात्कार
ऑपरेशन थिएटरमध्येच महिलेवर सामुहिक बलात्कार