आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात प्रवाशाला चावला विंचू!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्‍नई- चेन्नई विमानतळावर बहरिनला जाणा-या विमानात बसलेल्या एका प्रवाशाला विंचू चावल्यामुळे खळबळ उडाली. त्‍यामुळे विमान अर्धा तास उड्डाण रोखण्याची आले. डी. विद्यासागर असे या प्रवाशाचे नाव असून विंचू चावल्‍यानंतर ते बेशु्द्ध पडले. त्‍यांच्‍यावर तत्‍काळ वैद्यकीय उपचार करण्‍यात आले.
मूळचे पुड्डूचेरी येथील रहिवासी असलेले डी. विद्यासागर हे बहरिनला स्थायिक झाले आहेत. बहरिनला जाण्यासाठी ते चेन्नई विमानतळावर गल्फ एअरच्या विमानात बसले होते. सीट बेल्ट बांधत असताना त्‍यांना काळ्या विंचवाने दंश केला. त्‍यांच्‍या कोटमध्‍ये हा विंचू असावा, अशी शक्‍यता आहे. त्यांनी आणि सोबतच्या प्रवाशांनी आरडाओरड करताच विमानातील कर्मचारी धावून आले. विमान उड्डाणाच्‍या तयारीत होते. परंतु, ते रोखण्‍यात आले. विद्यासागर यांना वैद्यकीय उपचार देण्‍यात आले. विचवाला इतर प्रवाशांनी ठार केले. उपचारानंतर विद्यासागर यांची प्रकृती स्थिर होती. त्‍यांना प्रवासासाठी परवानगी देण्‍यात आली. परंतु, त्‍यांनी प्रवास रद्द करण्‍याचा निर्णय घेतला. दिवसभर विश्रांती घेतल्‍यानंतर ते रात्रीच्‍या विमानाने बहरिनला रवाना झाले.