आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सेबी'च्या सुधारणा जोरात; वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भांडवल बाजारातील गुंतवणुकदारांचा सहभाग जास्तीत जास्त वाढवा यासाठी बाजार नियंत्रक 'सेबी'ने आयपीओ आणि म्युच्युअल फंडांसाठी नवी नियमावली जाहीर करून एक दिवस होत नाही तोच अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भांडवल बाजारासाठी सेबी पुढील महिन्यात आणखी काही सुधारणा जाहीर करणार असल्याचे संकेत दिले आहे. गुंतवणुकदारांना सोन्याऐवजी वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देण्याचा उद्देश यामागे आहे.
सेबीने गुरुवारी आयपीओ, म्युच्युअल फंड व अन्य विभागांसाठी जाहीर केलेल्या विस्तृत सुधारणांबद्दल समाधान व्यक्त करून चिदंबरम यांनी गुंतवणुकदारांच्या फायद्यासाठी सुचवण्यात आलेल्या अन्य अनेक सूचनांमध्ये लक्ष घालण्याची विनंती आपण सेबीचे अध्यक्ष यू.के. सिन्हा यांना केली असल्याचे सांगितले. सरकार व सेबीकडून या शिफारशींची तपासणी दोन आठवड्यांत होईल. सप्टेंबरमध्ये सेबीच्या संचालक मंडळाची आणखी बैठक घेण्याची सूचना आपण सिन्हांना केली आहे. या बैठकीमध्ये आणखी काही शिफारशींवर विचार करून निर्णय घेता येऊ शकेल असेही चिदंबरम म्हणाले.
लवकरच निर्णय- प्रस्तावित राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम योजनेंतर्गत इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना कर लाभ देण्याची शिफारस सेबीने केली आहे. या शिफारशींवर केंद्र सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता देखल चिदंबरम यांनी व्यक्त केली.
सेन्सेक्सवर कॅगची काजळी- सकाळच्या सत्रातील तेजीच्या बळावर केलेली 140 अंकांची कमाईचा कॅगच्या अहवालाने कोळसा होऊन सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 33.87 अंकांची वाढ झाली. केवळ कोळसा कंपन्याच नाही तर ऊर्जा आणि हवाई उद्योगावरील कॅगच्या अहवालामुळे देखील बाजाराला धक्का बसला.
कारण कोळसा क्षेत्र वितरित झालेल्या कंपन्यांमध्ये टाटा पॉवर, हिंदाल्कोसारख्या काही बड्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे टाटा पॉवर (3.71}), जिंदाल स्टील पॉवर (4.02}) व हिंदाल्को (2.5}) यांचे समभाग विक्रीच्या मार्‍यात गडगडले. दिल्ली विमानतळ प्रवाशांवर विकास शुल्क आकारल्याबद्दल कडाडून टीका करताना कॅगने डिआयएएल कंपनीला 3,415 कोटी रुपयांपेक्षा जास्त फायदा करून देण्याच्या दृष्टीने निविदा नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले. परिणामी जीएमआर इन्फ्राची किंमत 3 टक्क्यांनी घसरली.