आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Secreat Report To Government : Cyber Attack Would Be On India

सरकारकडे गुप्त अहवाल : भारतावर सायबर हल्ल्याचे भयंकर कारस्थान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतात लवकरच मोठा सायबर हल्ला होऊ शकतो. चीन, पाकिस्तान आणि तुर्कीसारख्या देशांनी अशा प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भातील ठोस पुरावा सायबर अधिका-यांनी केंद्र सरकारला दिला आहे. संगणक, मोबाइल आणि लॅपटॉपची निर्मिती करणा-या काही कंपन्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतात याविषयीचे प्रशिक्षण देत आहेत.

‘दिव्य मराठी नेटवर्क ’ला मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण, आर्थिक, औद्योगिक क्षेत्र हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. गोपनीय, अति महत्वाचे दस्त ऐवज, आर्थिक देवाण-घेवाण, संरक्षण सामग्रीशी संबंधित तंत्रज्ञानावर हल्ल्याची योजना तयार करण्यात येत आहे. त्यासाठी देशातील सायबर गुन्हेगारही त्यांच्या मदतीला असल्याचे सांगण्यात येते.

अनेक देशांसोबत चर्चा : सिब्बल
सायबर हल्ल्याचा धोका वाढत चालला आहे. हॅकिंगसंबंधी आम्ही अनेक देशांबरोबर चर्चा करत आहोत. जपानसोबत आमची चर्चा झाली आहे, असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले. हॅकिंगचा सामना करण्यासाठी सरकारमधील लोकांना प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात येईल. त्याचबरोबर तंत्र विद्यापीठात एक विशेष अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हॅकिंगविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास सिब्बल यांनी व्यक्त केला.
ठोस योजनेचे आदेश
गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालयाशिवाय नॅशनल टेररिझम रिसर्च ऑर्गनायझेशन (एनटीआरओ) यांनी राष्ट्रीय सायबर सुरक्षा नियम तयार केले आहेत. अतिसंवेदनशील आणि गोपनीय दस्त ऐवजांच्या सुरक्षेसाठी नवीन योजना तयार करण्यात याव्यात, असे आदेश सरकारने नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटरला (एनसीआयआयपीसी) दिले आहेत.