आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा अधिकार्‍यांनाच बारकावे माहीत नाहीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानी दिल्ली, मुंबईसह महत्त्वपूर्ण शहरांमधील विमानतळांवरील सुरक्षा ज्यांच्या हाती आहे त्या 51 टक्के अधिकार्‍यांनाच सुरक्षेबाबतचे बारकावे माहीत नाहीत. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने (बीसीएएस) आयोजित देशभरातील प्रमुख विमानतळ सुरक्षा अधिकार्‍यांसाठी बेसिक एव्हिएशन सिक्युरिटी टेस्टचे आयोजन केले होते. त्यातून ही बाब गंभीर उघड झाली. या परीक्षेत विविध विमानतळांवरील सुरक्षा एजन्सीजचे 111 अधिकारी सहभागी झाले होते.

या परीक्षेत केवळ 51 अधिकारीच (48 टक्के) पास झाले, तर 60 (52 टक्के) सुरक्षा अधिकारी नापास झाले. दिल्लीसह मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरूसह 18 विमानतळांवरील अधिकारी यात सहभागी झाले होते. नापास होणार्‍यांत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकार्‍यांचे प्रमाण जास्त आहे.