आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानात पद्मविभूषणाचा ‘स्वयंघोषित’ मानकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर/ भरतपूर/अलवर/नवी दिल्ली - देशातील प्रतिष्ठित पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित करण्याच्या नावाखाली फसवेगिरी केल्याचे उघड झाले आहे. 26 जानेवारी 2013 रोजी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आपल्याला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याचा दावा भरतपूरच्या 18 वर्षीय बनयसिंह मीणा या विद्यार्थ्याने केला आहे.

25 जानेवारीच्या पद्म पुरस्कांच्या यादीत या विद्यार्थ्याचे नाव नाही हे वास्तव आहे. गृह मंत्रालयाने पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये संबंधित नाव नव्हते. त्यामुळे पुरस्कार देण्याचा प्रश्नच येत नाही, असे राष्‍ट्रपती भवनाने स्पष्ट केले आहे. सध्या पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले असून पुरस्कार प्रदान कार्यक्रम अद्याप बाकी असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

राष्‍ट्रपती भवन व गृह मंत्रालयाने सांगितले सत्य
चुकीचा दावा : राष्‍ट्रपतींकडून प्रदान
(बनयसिंह मीणाने ‘दिव्य मराठी नेटवर्क’ला सांगितले)
राष्‍ट्रपती भवनात 26 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता समारंभ सुरू झाला होता. मला राष्‍ट्रपतींनी स्वत: हा सन्मान दिला. याचे छायाचित्र अद्याप मिळाले नाही.
पुरस्कार देण्यासाठी माजी जिल्हाधिकारी गौरव गोयल यांचे सहकार्य मिळाले. त्यांनीच माझे नाव पाठवले होते.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राष्‍ट्रपती भवनातून पत्र आले होते. माझ्या वडिलांनी ते आयजी आनंद श्रीवास्तव यांना दिले होते.
बनयसिंहच्या वडिलांनी सांगितले, माझ्या मुलास खरेच पुरस्कार मिळाला आहे. आमचे एक नातेवाइक मुलासोबत राष्‍ट्रपती भवनात गेले होते.
वास्तव : 26 जानेवारी रोजी समारंभ झाला नाही
(राष्‍ट्रपती भवन-गृह मंत्रालयाच्या अधिका-यानी हे सांगितले)
सध्या पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. ते प्रदान करण्यात आले नाहीत. 26 जानेवारी रोजी राष्‍ट्रपती भवनात समारंभ झाला नाही. हा सोहळा 16 मार्चला होईल.


गौरव गोयल म्हणाले, बनयसिंह राष्‍ट्रपती भवनचा पत्ता विचारण्यासाठी आले होते. मी कोणतीही शिफारस केली नाही.
आयजी श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोणतेही पत्र दिले नाही. मुलाने प्रमाणपत्र आणले होते. मी त्याच्या वडिलांना सांगितले होते की, त्याला पद्मविभूषण मिळाले नाही. एखादा व्यक्ती हा पुरस्कार मिळाल्याचे सांगत असेल तर त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे.


कोणाला मिळतो पद्मविभूषण
पद्मविभूषण देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 2 जानेवारी 1954 रोजी त्याची सुरुवात झाली होती. हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जातो.


बनावट पुरस्कार बनवल्यास शिक्षा
अधिवक्ता एन.डी. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, फसवणुकीसाठी सात वर्षे, फसवणुकीसाठी बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी जन्मठेपेची शिक्षा होईल. बनावट दस्तऐवजाच्या वापरासाठी जन्मठेप व दहा वर्षांची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.


केवळ घोषणा
पद्मविभूषणसह सर्व पद्म पुरस्कारांची केवळ घोषणा झाली आहे. हा पुरस्कार कोणाला दिला नाही. पुरस्कार सोहळा मार्चमध्ये होईल, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते के. एस. धतवालिया म्हणाले.


26 मार्च रोजी सोहळा
पद्म पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 26 मार्चला होईल. यामध्ये पुरस्कार प्रदान केले जातील, असे राष्ट्रपती भवनातील एका अधिका-याने सांगितले.