आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारीरिक शिक्षणातून मुलींना संरक्षणाचे धडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुलींवरील अत्याचाराची प्रकरणे थांबत नसल्याचे लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व राज्यांना शालेय पातळीवर आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचे आदेश बजावले आहेत. उच्च प्राथमिक पातळीवर शारीरिक शिक्षणाद्वारे हे धडे दिले जाणार आहेत.
शाळेमध्ये मुलींना शारीरिक शिक्षणाच्या वर्गातूनच स्वसंरक्षणासाठी आवश्यक ते प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. तशी सोय शालेय पातळीवर करण्यात यावी, अशी सूचना जानेवारीमध्ये सर्व राज्यांच्या सचिवांना करण्यात आली आहे, अशी माहिती मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. मुलींवरील हिंसाचाराच्या घटना अजुनही थांबल्याचे दिसून येत नाही. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एका कार्यदलाची स्थापना केली आहे. हे दल महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुचवते.

158 अभ्यास केंद्र
महिलांच्या सुरक्षेचा विचार करून देशात महिलांसाठी 158 अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले. त्यात 82 विद्यापीठे आणि 76 महाविद्यालय आहेत, अकरावी आणि बारावीसाठी ह्यूमन राईट्स अँड जेंडर स्टडीज हा अभ्यासक्रम सीबीएसईने सुरू केला आहे.