आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रॉचा चीनमधील अधिकारी बडतर्फ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रॉ या भारतीय परराष्ट्र गुप्तचर संस्थेचे चीनमधील प्रमुख अधिकारी अम्रीत अहलुवालिया यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टीने एखाद्या अधिका-याची चौकशी न करता त्याला तत्काळ बडतर्फ करण्याच्या घटनात्मक तरतुदींचा वापर करून ही कारवाई करण्यात आली.
सहसचिव दर्जाचे चीनमधील रॉचे अधिकारी अम्रीत अवहुवालिया यांच्याविरुद्ध झालेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याविरुद्धचे आरोप जाहीर करण्यात आले नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्व राष्ट्रपतींच्या लक्षात आल्यानंतर कोणत्याही अधिका-याला चौकशी न करता किंवा बाजू मांडण्याची संधी न देता बडतर्फ करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 311 (2)मध्ये आहे. संबंधित अधिका-यांनी अहलुवालिया यांना माघारी बोलावले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.