आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीसाठी 28 जानेवारी रोजी ठरवून दिलेली अंतिम मुदत पाच दिवसांवर आली असताना तेलंगणाचा प्रस्ताव पुन्हा रखडला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी अवधी लागेल, असे कॉँग्रेसने म्हटले आहे.
कॉँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी या मुद्द्यावर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी तेलंगणाची निर्मिती इतक्यात होऊ शकत नसल्याचे निर्देश दिले. आझाद आंध्र प्रदेश कॉँग्रेसचे प्रभारी आहेत. बैठकीस गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अनिवासी भारतीय प्रकरणाचे मंत्री वायलर रवी, सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांची उपस्थिती होती. एका महिन्याच्या मुदतीचा अर्थ शब्दश: घेऊ नये. एक आठवड्याची मुदत म्हटले असले तरी ही मुदत दोन आठवड्यापर्यंत जाऊ शकते, असे आझाद यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.