आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serial Bomb Blasts Rock Manipur On Independence Day

ममता बॅनर्जींनी केले परंपरेचे उल्लंघन; मणिपूर साखळी स्फोटांनी हादरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मणिपूरची राजधानी इम्फाळ चार साखळी शक्तीशाली स्फोटांनी हादरली. दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी देश स्वातंत्र्य झाल्यापासून सुरू झालेल्या परंपरेचे उल्लंघन केले. ममतानी आज पहिल्यांदा कोलकाता येथील 'रेड रोड'वर ध्वजारोहण करून राज्याची 66 वर्षांची परंपरा तोडली. कोलकाता येथील 'रॉयटर्स बिल्डिंग'वर आजपर्यंत ध्वजारोहण केले जात होते.
स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात कडक सुरक्षा व्यवस्था असताना मणिपूर आज सकाळी चार स्फोटांनी हादरले. पहिला स्फोट थौबल जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयाजवळ एका सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला.
त्यानंतर तीन शक्तीशाली बॉम्ब स्फोट राजधानी इम्फाळ येथे झाले. यावेळी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंगांचे रायफल्स परेड मैदानावर भाषण सुरु होते.
या साखळी स्फोटात वाय मनाउ सिंग (52), सनबंता दास (22), आकोयजाम देवी (65) आणि निंगोबम मणिसम देवी (65) असे चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
पुढील पाच वर्षात देशातील प्रत्येक घरात वीज पोहचेल - पंतप्रधान
आंदोलनाची अनागोंदी धोकादायक असल्याचे राष्‍ट्रपतींचे मत
राज्यातील मान्यवरांनी व्यक्त केल्या देशाप्रती भावना