आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून सात जणांची गळा चिरून हत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुंटी: झारखंडची राजधानी रांचीपासून जवळच असलेल्या खुंटी जिल्ह्यातील घाघरा गावात बुधवारी नक्षलवाद्यांनी सात जणांची गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्याकांडामुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खुंटी जिल्हा हा नक्षल प्रभावित म्हणून ओळखला जातो.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घाघरा गावात बुधवारी सकाळी अज्ञात नक्षलवाद्यांनी सात जणांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे चेहरे दगडाने ठेचले आहे. त्यामुळे अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. पोलिसांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे हल्लेखोरांचा पोलिस शोध घेत आहेत, असे खुंटीचे पोलिस निरिक्षक डॉ. एम. तमिल वामण यांना सांगितले.