आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven year old Raped In Goa School; Headmistress Detained

गोव्‍यात 7 वर्षाच्‍या चिमुकलीवर शाळेतच बलात्‍कार, संतप्‍त नागरिकांचा शाळेला घेराव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्‍को- गोव्‍यामध्‍ये शाळेतच एका चिमुकलीवर बलात्‍काराच्‍या घटनेने खळबळ उडाली आहे. काल एका शाळेतच तिच्‍यावर बलात्‍कार करण्‍यात आला. या घटनेविरोधात पणजीमध्‍ये तीव्र निदर्शने करण्‍यात येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिकेला हलगर्जीपणा दाखविल्‍याच्‍या कारणावरुन अटक केली आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता दुसरीत शिकते. शाळेच्‍या टॉयलेटमध्‍येच या 7 वर्षीय चिमुकलीवर अज्ञात व्‍यक्तीने बलात्‍कार केला. मुख्‍याध्‍यापिकेच्‍या कार्यालयाच्‍या काही फुटांवरच टॉयलेट आहे. मुलीने प्रचंड वेदना होत असल्‍याची तक्रार केली. तेव्‍हा तिला रुग्‍णालयात नेण्‍यात आले. तपासणीनंतर बलात्‍काराचा प्रकार उघड झाला. हे कळताच मुलीचे नातेवाईक आणि स्‍थानिक नागरिकांनी शिक्षक आणि व्‍यवस्‍थापनाच्‍या सदस्‍यांना शाळेतच बंद केले. सुमारे 500 पेक्षा जास्‍त नागरिक शाळेबाहेर जमा झाले. लोकांनी अजुनही शाळेला घेराव टाकलेला आहे. मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर आणि स्‍थानिक नेत्‍यांनी शाळेत धाव घेतली. परंतु, नागरिक शांत झाले नाहीत. मुलीने दिलेल्‍या माहितीनुसार आरोपीचा शोध सुरु आहे.

विशेष म्‍हणजे, ही शाळा शहरातील उच्च श्रेणीची शाळा आहे. सीआयएसएफचे जवान शाळेच्‍या सुरक्षेसाठी तैनात आहेत.