आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंग-गुणोत्तरात भारत मागे, अल्टरनेटिव्ह इकॉनॉमिक सर्व्हेचा निष्कर्ष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाचा विकास वेगाने होत असूनही महिलांची स्थिती आणि लिंग-गुणोत्तराबाबत भारत जगापेक्षा खूपच मागे असल्याची माहिती अल्टरनेटिव्ह इकॉनॉमिक सर्व्हेसाठी गोळा केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
या माहितीनुसार भारतात दरवर्षी 6 लाख मुली जन्माला येऊ शकत नाहीत आणि सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकसंख्येत लिंग-गुणोत्तर फक्त 914 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात दर हजार पुरुषांमागे 940 महिला, असे प्रमाण आहे. मागील 20 वर्षांतील हे सर्वात चांगले प्रमाण असले तरी शेजारी देश, विकसित किंवा वेगाने विकसित होणाºया देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
शेजारी देशांपैकी नेपाळमध्ये हेच प्रमाण 1000 पुरुषांमागे 1041 महिला, इंडोनेशियात 1000-1004 व चीनमध्ये 1000-944 असे आहे. पाकिस्तानही 1000-938 प्रमाणासह भारताच्या बरोबरीत येत आहे. वर्ल्डफॅक्ट बुकमधील आकडेवारीनुसार बहुतांश विकसित देशांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक नोंदवण्यात आली आहे. जगात सरासरी 1000 पुरुषांमागे 990 महिला, असे प्रमाण आहे. ब्राझिल, अमेरिका, रशिया, जपान, नायजेरिया, फ्रान्स, व्हिएतनाम व इस्रायलमध्येही लिंग-गुणोत्तर जास्त आहे.
श्रीमंत करतात जास्त भ्रूणहत्या: अभ्यासकांचे मत आहे की, कन्या भ्रूण हत्येचे प्रकार श्रीमंत वर्गातच जास्त होतात. गर्भलिंग तपासणी आणि गर्भ नष्ट करण्याची प्रक्रिया महाग असणे हेही याचे एक कारण आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, श्रीमंत लोक खर्च करू शकत असल्यामुळे मुलाच्या इच्छेने कन्या भ्रूण हत्या या वर्गात जास्त होतात आणि बाल लिंग-गुणोत्तरही या वर्गात कमीच आहे.

ख्रिश्चन सर्वात पुढे
भारतात ख्रिश्चनधर्मीयांमध्ये लिंग-गुणोत्तर सर्वाधिक असल्याचे धार्मिक समूहांच्या आधारे केलेल्या जनगणनेतून समोर आले आहे. दुसºया क्रमांकावर मुस्लिम तर तिसºया क्रमांकावर हिंदू आहेत. 0 ते 6 वर्षांच्या मुलांचे लिंग गुणोत्तर ख्रिश्चनांमध्ये 964 आहे. मुस्लिम दुसºया क्रमांकावर असून, राष्टÑीय सरासरीपेक्षा त्यांचे लिंग-गुणोत्तर जास्त आहे. मागील जनगणनेनुसार मुस्लिम समाजात 1000 पुरुषांमागे 950 महिला असे प्रमाण आहे, तर शीख समुदायात हे प्रमाण सर्वात कमी 786 आणि जैनांमध्ये 870 असे आहे. देशात 80.5 टक्के लोकसंख्या हिंदूंची आहे आणि त्यांच्यातील लिंग-गुणोत्तर 925 असून, राष्टÑीय सरासरीपेक्षा हे प्रमाण कमी आहे.

स्त्री-पुरुष संख्या तुलनात्मक स्थिती
देश लिंग-गुणोत्तर
नेपाळ 1041
इंडोनेशिया 1004
चीन 944
ब्राझिल 1025
अमेरिका 1029
रशिया 1140
जपान 1041
नायजेरिया 1016
फ्रान्स 1041
पाकिस्तान 938
इस्रायल 1000