आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयएएसच्या पत्नीला अश्लील एसएमएस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शोपूर - मध्य प्रदेशातील आयएस अधिकारी व शोपूर जिल्ह्याच्या माजी जिल्हाधिका-यांच्या पत्नीला छेडछाडीची पोलिसांत तक्रार नोंदवण्यासाठी 20 दिवस हेलपाटे घालावे लागले. या महिलेने अखेर राज्याचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता व चंबळचे पोलिस महासंचालक एस. ए. अफझल यांना फोन केला आणि तिची तक्रार नोंदवली गेली. आयएएस सोहेल अख्तर यांची पत्नी शबनम यांना फेसबुकवर अश्लील एसएमएस पाठवले जात होते.


या प्रकरणी जिल्हा प्रकल्प समन्वयक कार्यालयातील असिस्टंट इंजिनिअर दीपक त्रिपाठीवर आरोप करण्यात आले आहेत. याच कार्यालयात शबनम डाटा एन्ट्री ऑपरेटर आहेत. सोहेल सध्या इंफाळचे जिल्हाधिकारी आहेत. 27 जानेवारीला शबनम यांनी सर्वप्रथम तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी दखल घेतली नाही. शेवटी 20 दिवस हेलपाटे घातल्यावर त्यांना तक्रार दाखल करण्यात यश आले.