आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार नाराज, ममता पुन्‍हा रुसल्‍या; 'युपीए'मध्‍ये फूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः यूपीएने उपराष्‍ट्रपतीपदासाठी हामिद अन्‍सारी यांनाच पुन्‍हा उमेदवारी जाहीर केल्‍यानंतर पुन्‍हा एकदा केंद्रात राजकीय नाट्य सुरु झाले आहे. कॅबिनेटमध्‍ये ए. के. एन्‍टोनी यांना दुस-या क्रमांकाचे स्‍थान प्राप्‍त झाल्‍यामुळे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार नाराज झाले आहेत. तर अन्‍सारी यांच्‍या उमेदवारीमुळे ममता बॅनर्जीही भडकल्‍या आहेत.
हामिद अन्‍सारी यांच्‍या उमेदवारीची घोषणा युपीएच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी यांनी काल रात्री केली. परंतु, अन्‍सारी यांच्‍या नावाला ममतांचा विरोध आहे. तृणमूल कॉंग्रेसने गोपाळ कृष्‍ण गांधी आणि कृष्‍णा बोस यांची नावे उपराष्‍ट्रपतीपदासाठी पुढे केली. गोपाळ कृष्‍ण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू आहेत. तर कृष्‍णा बोस या सुभाष चंद्र बोस यांच्‍या पुतण्‍याच्‍या पत्नी आहेत. युपीएच्‍या बैठकीनंतर रेल्‍वेमंत्री मुकुल रॉय यांनी अन्‍सारी यांच्‍या उमेदवारीबाबत पक्षाने अद्याप भूमिका घेतलेली नसल्‍याचे सांगितले. ममता बॅनर्जी यांच्‍याशी चर्चा केल्‍यानंतरच अन्‍सारींना पाठींबा देण्‍याबाबत निर्णय घेण्‍यात येईल, असे रॉय यांनी स्‍पष्‍ट केले.
एकीकडे ममता बॅनर्जी पुन्‍हा रुसल्‍या झाल्‍या आहेत. तर दुसरीकडे शरद पवारही नाराज झाले आहेत. एंटोनी यांना कॅबिनेटमध्‍ये अनौपचारिकरित्‍या दुसरे स्‍थान मिळाल्‍याचे चित्र निर्माण झाले आहे. त्‍यामुळे एनसीपीच्‍या वतीने युपीएच्‍या बैठकीत पवार सहभागी झाले नाही. परंतु, प्रफुल्‍ल पटेलही अनुपस्थित होते. एनसीपीचा हा बहिष्‍कार पवारांच्‍या नाराजीचा संकेत आहे. पंतप्रधानांना ममता बॅनर्जींचे मन वळविण्‍यासाठी पुन्‍हा एकदा तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर पवार नाराज झाल्‍यामुळे युपीएमध्‍ये फूट पडण्‍याची शक्‍यता आहे.
उपराष्ट्रपतिपदासाठी पुन्हा हमीद अन्सारी
राष्ट्रपतिपद हे शोभेचे नाही - मुखर्जी ; ठाकरेंची मातोश्रीवर घेतली भेट
ममता बॅनर्जींनी धुडकावले सोनियांचे भोजनाचे निमंत्रण