आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashi Tharoor Backs Narendra Modi Over Wharton India Economic Forum Lecture Issue

शशी थरुर मोदींच्‍या पाठीशी, जर्मनीनेही बदलली भूमिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गुजरात दंगलींवरुन सतत वादामध्‍ये अडकणारे गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांना जर्मनीने मोठा दिलासा दिला आहे. तर कॉंग्रेसचे नेते आणि केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. मात्र, राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदींनी केलेल्‍या स्‍तुतिचे प्रत्‍युत्त देऊन मोदींवर टीका केली आहे.

व्‍हार्टन स्‍कूलने मोदींचे भाषण रद्द केल्‍यावरुन विविध स्‍तरांमधुन मोदींना समर्थन मिळाले होते. त्‍यात शशी थरुर यांचाही समावेश झाला आहे. मोदींचे म्‍हणणे ऐकून घ्‍यायला हवे होते, असे थरुर म्‍हणाले. तर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनीही मोदींना पाठींबा दिला आहे. इतर वक्त्‍यांप्रमाणे आपल्‍यालाही आमंत्रण देण्‍यात आले असून ते 23 मार्चला व्हीडिओ कॉन्‍फरंसच्‍या माध्‍यमातून संवाद साधणार आहेत, असे केजरीवाल यांनी सांगितले. मोदींऐवजी त्‍यांना आमंत्रित केल्‍याचे मात्र केजरीवाल यांनी फेटाळले.

भाजपच्‍या राष्‍ट्रीय परिषदेमध्‍ये मोदींनी प्रणव मुखर्जी यांची स्‍तुति केली होती. त्‍यावर मुखर्जी यांनी मोदींचे नाव न घेतला स्‍वतःचे विश्‍लेषण स्‍वतःजवळच ठेवावे, असा सल्‍ला दिला. बांगलादेश दौ-यावरुन परतताना विशेष विमानात पत्रकारांनी राष्‍ट्रपतींची प्रतिक्रीया जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यावेळी त्‍यांनी हे उत्तर दिले.