आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shekhpura Bihar SP Having Rung In Private Part Of A Man, Suspend

बिहारमध्ये पोलिस कोठडीत युवकावर अनैसर्गिक अत्‍याचार, एसपीची बदली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- एका दारु व्यवसायिकाला बेदम व अमानवीय मारहाण केल्याप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या आदेशानुसार शेखपुरा शहरचे एसपी बाबू राम यांना हटविण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी नितीशकुमार यांनी आपल्या निवासस्थानी गृहसचिव आमिर सुबहानी आणि डीजीपी अभयानंद यांना बोलवून या घटनेची माहिती घेतली. बैठकीत एसपी बाबू रामला हटवण्याचा व बरबीघा पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचा-यांना लाइन हजर करण्याचा निर्णय घेतला. बाबू राम यांना पाटण्यातील पोलिस मुख्यालयात काम करण्यास सांगण्यात आले आहे.

दारु व्यवसायिक मुकेश ऊर्फ छोटूला बरबीघा पोलिसांनी 24 जानेवारीला एक जुने प्रकरण उकरुन पकडले होते. त्या पकडल्यानंतर पोलिस कोठडीत त्याला इतकी मारहाण करण्यात आली की त्यांची प्रकृती एकदम गंभीर झाली आहे. त्याला पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांवर आरोप आहे की, त्यांनी सबंधित दारु व्यवसायिकाच्या गुप्तांगामध्ये दांडाच घातला. ज्यामुळे पोटातील जखम खोलवर झाली आहे. त्याचे पोटातील आतडेही तुटले आहे. युवक सध्या आयसीयूमध्ये आहे.

जखमी युवकाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, छोटूला एसपींच्या बंगल्यावर नेण्यात आले व जबरदस्त मारहाण केली. रविवारी शेखुपराहून पाटण्यात जात एसपी बाबू राम यांनी रुग्णालयात जावून संबंधित युवकाची भेट घेतली. एसपीने मात्र आपल्या बंगल्यावर मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. युवकाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. या प्रकरणात विरोधी पक्षाने हल्लाबोल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला हटविण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. रविवारी राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी रुग्णालयात जावून युवकाची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यात प्रशासन व कायदा व्यवस्था राहिली नसल्याचे सांगत येथे कोणीही सुरक्षित नाही, असे वक्तव्य लालू यांनी केले होते.