आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shekhpura Bihar SP Having Rung In Private Part Of A Man, Suspend

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांकडून अनैसर्गिक अत्‍याचार झालेल्या युवकाची प्रकृती बिघडली; सरकारने झटकले हात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बिहारमधील एका पोलिस अधीक्षकाने अनैसर्गिकरित्‍या छळ केलेल्‍या 21 वर्षाच्या युवकाची प्रकृती खालावली असून सरकारने याप्रकरणी हात झटकले आहेत. या अधिका-याने पीडित युवकाच्या गुद्वारात काठी घुसवल्याने त्याचे मोठे आतडे तुटले आहे. दिल्‍लीतील गँगरेप प्रकरणातील पीडित तरुणीच्‍या आतड्याला ज्‍याप्रकारे गंभीर जखमा झाल्‍या होत्‍या, तशीच स्थिती या युवकाची झाली असून तो आता कधीही स्‍वतःच्‍या पायावर उभा राहू शकणार नाही, अशी अवस्‍था झाली आहे. पाटण्यातील अयशस्वी ऑपरेशन नंतर युवकाला दिल्लीत दाखल केले आहे. या क्रूरतेमुळे नितीश सरकारने एसपीला निलंबित केले आहे.

या युवकाचा मेडिकल खर्च राज्य सरकार करणार होते मात्र, त्यासही आता सरकारने असमर्थता दाखविली आहे. दिल्लीत उपचार सुरु असलेल्या या युवकाने आपली व्यथा मांडली तेव्हा अंगावर काटे आले.

ही घटना 24 जानेवारी रोजी घडली आहे. शेखपुरा जिल्ह्यातील टोयगढ येथील दारु व्यावसायिक मुकेश कुमार नावाच्या या युवकाला जयरामपुर पोलिस ठाण्याच्या पोलिस शिपाई व त्याच्या एका सहका-याने पोलिस अधीक्षक बाबूराम यांच्या घरी नेले होते. त्यानंतर पोलिस अधीक्षक व इतरांनी या युवकाचे कपडे काढून मारहाण केली होती. त्यात मुकेशकुमार यांचे पोटातील आतडे तुटले होते. त्याची जखम गुप्तांगापर्यंत झाली होती. त्याला पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे झालेले ऑपरेशन यशस्वी झाले नाही. पोलिसांवर आरोप आहे की, त्यांनी सबंधित दारु व्यवसायिकाच्या गुप्तांगामध्ये दांडाच घातला. ज्यामुळे पोटातील जखम खोलवर झाली आहे.

जखमी युवकाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, दारु व्यवसायिक मुकेश ऊर्फ छोटूला बरबीघा पोलिसांनी एक जुने प्रकरण उकरुन पकडले. छोटूला एसपींच्या बंगल्यावर नेण्यात आले व जबरदस्त मारहाण केली. एसपीने मात्र आपल्या बंगल्यावर मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. युवकाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. या प्रकरणात विरोधी पक्षाने हल्लाबोल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला हटविण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी रुग्णालयात जावून युवकाची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यात प्रशासन व कायदा व्यवस्था राहिली नसल्याचे सांगत येथे कोणीही सुरक्षित नाही, असे वक्तव्य लालू यांनी केले होते.