आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगदिश शेट्टर कर्नाटकेच नवे मुख्यमंत्री, राजभवनात घेतली शपथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरुन सदानंद गौडा पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी ५६ वर्षीय लिंगायत नेत जगदीश शेट्टर यांची वर्णी लागली. शेट्टर यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मागील चार वर्षातील कर्नाटकचे ते तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के.एस.ईश्वरप्पा आणि माजी गृहमंत्री आर. अशोक यांनी शपथ घेतली.

कर्नाटकचे राज्यपाल एच.आर.भारद्वाज यांनी राजभवन येथे शेट्टर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. बी.एस.येडियुरप्पा खाण घोटाळ्यात अडकल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यानंतर सदानंद गौडा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. मात्र येडियुरप्पा यांनी गौडा यांना विरोध केल्यामुळे भाजप नेतृत्वाला त्यांना बदलावे लागले. त्यांच्या ऐवजी येडियुरप्पा समर्थक हुबळी ग्रामीण मतदार संघातून विजयी झालेले शेट्टर यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली.
सदानंद गौडा देणार राजीनामा, जगदीश शेट्टर होणार कर्नाटकचे नवे मुख्‍यमंत्री
कर्नाटक : येडियुरप्पा समर्थक 9 मंत्र्यांचे राजीनामे मागे
येडियुरप्पा हे तर भाजपमधील मानवी बॉम्ब- बाळासाहेब ठाकरे
रा. स्व. संघ म्हणतो, 'येडियुरप्पा हे नापास स्वयंसेवक !'