आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आयटम साँग\' व डान्समुळे वाढताहेत महिलांवर बलात्कार\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- दिल्ली गॅंगरेपच्या घटनेनंतर वादग्रस्त वक्तव्यांची रीघच लागली आहे. आता जनता दलाचे (संयुक्त) नेते शिवानंद तिवारींनी नवे तत्वज्ञान पाजाळले आहे. तिवारींचे म्हणणे आहे की, चित्रपटातील आयटम डान्स आणि साँगमुळे महिलांवर बलात्कारासारख्या घटना घडत आहेत. तसेच अशा दृश्यांमुळे महिलांवर अत्याचार करण्यास प्रेरणा मिळते.
तिवारी म्हणाले, आजकाल चित्रपटात जे आयटम साँग आणि डान्स दाखवले जातात त्यामुळे उत्तेजना तयार होते. अशा तोकड्या कापडांमध्ये वेडेवाकडे शरीर हलविल्यानंतर कोण उत्तेजित होणार नाही? राज्यसभेचे खासदार व पक्षाचे प्रवक्ते असलेल्या तिवारींनी यासाठी पौराणिक कथांची उदाहरणे दिली. ते म्हणाले, जे तपश्चर्या करीत असे त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर अप्सरा पाठवल्या जात असत. ज्या आपल्या सौदर्यांमुळे व अदांमुळे तपश्चर्या करणा-यांचे ध्यान भंग करीत असे. त्या अप्सराचे नृत्यही आजकालच्या आयटम साँगसारखीच असत. उधारीकरणामुळे जग जवळ येत असून, या युगात महिलांना चित्रपट, जाहीरात इत्यादी ठिकाणी वस्तूंच्या रुपात दाखविले जाते. त्याचा युवकांवर वाईट परिणाम होतो.

तिवारींच्या या वक्तव्यांमुळे फिल्म इंडस्ट्रीही भडकली आहे. भोजपुरी चित्रपटात आयटम डान्स करण्यासाठी सर्वात जास्त पैसे घेणारी संभावना शेठ हिने तिवारींचे वक्तव्य बकवास असल्याचे म्हटले आहे.