आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shock For Rajasthan Royals, 100 Cr Fine From Iddi

शिल्‍पा शेट्टीला मोठा झटका; राजस्‍थान रॉयल्‍सला 100 कोटींचा दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अमलबंजावणी संचालयनाने आयपीएलमधील टीम राजस्थान रॉयल्सवर 100 कोटींचा दंड ठोकला आहे. या टीमवर फॉरेन एक्सचेंज मेन्टेनन्स एक्ट (फेमा)चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा या टीमचे सहमालक आहे.

हा निर्णय इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव झाल्यानंतर दुस-या दिवशी आला आहे. रविवारीच 9 फ्रेंचायजनी 101 खेळाडूमधून 37 खेळाडूंना कोट्यावधी रुपये देऊन खरेदी केले आहे. तसेच आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा वापर होत असल्याचे बोलले जाते. तसेच संघमालकी खरेदी करणे, खेळाडूंना खरेदी करणे यातही काळ्या पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केला जात आहे. खेळाडूंना अधिकृत किंमत कमी देऊन त्यांना अतिरिक्त ब्लॅक मनी देण्यात आल्याचे आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या काही दुय्यम खेळाडूंनी गेल्यावर्षी आरोप केला होता. दरम्यान, रा़जस्थान रॉयल्सला हा दंड भरण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली आहे. तसेच या निर्णयाला आव्हान देता येईल.

IPL-6: हे आहेत पाच क्रिकेटपटू... ‍ज्यांच्यावर झाला पैशाचा पाऊस!