आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Shocked\' I T Officers Body Demands Apology From Gadkari

गडकरींनी माफी मागावी- प्राप्‍ति‍कर खात्‍याच्‍या अधिकारी संघटनेची मागणी, वाद वाढणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- प्राप्‍तीकर खात्याच्या अधिका-यांबाबत भारतीय जनता पक्षाचे माजी अध्‍यक्ष नितीन गडकरी यांनी केलेल्‍या वक्तव्‍यावरुन वाद वाढण्‍याची शक्‍यता आहे. प्राप्‍तीकर खात्‍याच्‍या अधिका-यांनी गडकरींच्‍या वक्तव्‍याचा निषेध केला असून गडकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्‍यात आली आहे.

प्राप्तीकर खात्‍याच्‍या अधिका-यांच्‍या 'आयआरएस' संघटनेने गडकरींच्‍या वक्तव्‍याचा निषेध करताना म्‍हटले आहे की, नितीन गडकरींचे वक्तव्‍य धक्‍कादायक आहे. ही बाब आम्ही गांभीर्याने घेतली आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याने अशा स्वरूपाची भाषा वापरणे ही घटना चिंताजनक आहे. गडकरींनी दिलेल्या धमकीबद्दल बिनशर्त माफी मागावी. पूर्ती उद्योग समूहाच्या निःपक्ष चौकशीला नितीन गडकरी यांच्या धमकीने बाधा येण्याची शक्‍यता असल्याचे प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांच्या संघटनेने सांगितले आहे. या उद्योग समूहाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी संघटनेने केली आहे.

भाजपच्‍या राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर नागपुरात गडकरींनी प्राप्‍तीकर खात्‍याबाबत वक्तव्‍य केले होते. राजकीय सुडातून पूर्ती उद्योग समुहावर छापे टाकण्यात आले असून आमचे सरकार आल्यावर हे अधिकारी कुठे जातील, असे गडकरी म्‍हणाले होते. हे वक्तव्‍य म्‍हणजे एक प्रकारे धमकीच असल्‍याचे प्राप्‍तीकर खात्‍याच्‍या अधिका-यांच्‍या संघटनेने म्‍हटले आहे