आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ/कोलकाता- भाजपनेत्या उमा भारती आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. उमा भारतींनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत विदेशीचा मुद्दा पुन्हा उकरुन काढला. तर ममतांनी थेट पंतप्रधानांवरच हल्लाबोल केला.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या जनक्रांती पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण झाले. त्यावेळी उमा भारती यांनी सोनियांवर टीका केली. राहुल गांधी यांच्या एका वक्तव्याचा समाचार घेतना त्या म्हणाल्या, कॉंग्रेसमध्ये पूर्णपणे हिंदूस्थानचा डीएनए राहिलेला नाही. त्यात इटलीचा डीएनए मिसळला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले. सोमवारी एका सरकारी कार्यक्रमात त्या म्हणाल्या की, 'राज्याला आर्थिक पॅकेज पाहिजेच', हे मी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना किमान 10 वेळेस बोलून ठेवले आहे. मात्र कुणी लक्षच देत नाही. 2011, 2012 मध्ये आर्थिक पॅकेजसाठी मी पंतप्रधानांना भेटलेही होते. आता मी काय करू? पंतप्रधानांना बडवून काढू काय?? तसे केले तर तुम्ही म्हणाल, दीदी आता गुंड बनली आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.