आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैद्राबाद- मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुसलिमीन (एमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असादुद्दीन ओवेसी यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज हैद्राबाद बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे शहरात शाळा, शैक्षणिक संस्था, दुकाने तसेच बाजारपेठा आज बंद आहेत. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाने प्रमुख भागातील बससेवा बंद ठेवली. याशिवाय ऑटोरिक्षा आणि टॅक्सीही बंद असलयामुळे नागरिकांचे हाल झाले. कायम वर्दळीचा ऐतिहासिक चारमिनार येथील परिसर शांत होता. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात ठिकाठिकाणी पोलिस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. हैद्राबादशिवाय तेलंगण भागातील काही जिल्ह्यांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला.
मेडकच्या जिल्हाधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी ओवेसी सोमवारी संगरेड्डी न्यायालयात शरण आले होते. न्यायालयात शरण आल्यानंतर त्यांना 14 दिवसांचा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर आज प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले 'एमआयएम'चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची न्यायालयीन कोठडी 5 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.