Home »National »Delhi» Sibal Turns Lyricist With His First Romantic Song

‘बावरे नैना... जो भी कहना, चुप-चुप कहना...’

नॅशनल ब्युरो | Jan 07, 2013, 03:05 AM IST

  • ‘बावरे नैना... जो भी कहना, चुप-चुप कहना...’

नवी दिल्ली - काँग्रेसचे दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री, 2 जी स्पेक्ट्रम वादाच्या काळात सरकारचे संकटमोचक आणि आता गीतकार...! हा प्रवास आहे केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांचा. कवी, वकील अशीही ओळख असलेले सिब्बल आता नव्या भूमिकेत रसिकांसमोर येणार आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘ बावरे नैना... जो भी कहना, चुप-चुप कहना’ ही रोमँटिक कविता गीत म्हणून चित्रपटासाठी संगीतबद्ध करण्यात आली आहे. सिब्बल यांच्या कवितेचा समावेश असलेला ‘बंदूक’ हा चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बंदूक चित्रपटास निखिल यांनी संगीत दिले आहे. सिब्बल यांचा गीतकार म्हणून असलेला प्रवास हा काही अपघाती नाही किंवा तो एका गाण्यापुरताही मर्यादित नाही, तर सिब्बल यांच्या कविता व्हिडिओ अल्बम रूपातही रसिकांसमोर येणार आहेत. त्यावर सध्या काम सुरू असून तो याच वर्षी प्रकाशित होईल.

राजकारणाच्या धावपळीतही सिब्बल यांनी त्यांचे वेगळेपण जपले आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचा वावर दिसून येत आहेत. सिब्बल यांनी लिहिलेल्या कवितांच्या अल्बमवर काम सुरू असून कॅसेट कंपनी टी सिरीजतर्फे त्याची निर्मिती केली जात आहे. यापैकी एका गीताला गायक अदनान सामी यांनी स्वर दिला आहे.

सिब्बल यांच्या कविता या सामाजिक विषयांवरही आहेत. त्यांनी लिहिलेले एक गीत गरीब, असहाय व्यक्तींना अदृश्य सामर्थ्य देण्याची देवाकडे अपेक्षा व्यक्त करणारे आहे. ‘बेबसों को शक्ती दे मौला’ या गीताचा वापर निवडणुकीत विरोधी पक्ष, काँग्रेस किंवा त्यांच्या सरकारच्या विरोधात करणार नाहीत काय? असे विचारले असता सिब्बल म्हणाले की, हे गाणे मनाला शांतता देणारे व प्रेरणा देणारे आहे. यात राजकारण होऊ नये.

ही एक सुरुवात आहे - गीतकार म्हणून सुरू होत असलेल्या नव्या भूमिकेबाबत विचारले असता सिब्बल म्हणाले, ही केवळ एक सुरुवात आहे. नव्या वर्षात चित्रपट गीतकार म्हणून ओळख मिळणे ही एक उपलब्धी आहे; परंतु नव्या वर्षाने आपल्याला कधीही विसरू शकणार नाही असे दु:ख दिल्याचेही ते म्हणाले. सिब्बल यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. सिब्बल यांच्यासोबत वडिलांची खूपच भावनिक जवळीक होती.

पहिले मोबाइल कवी - सिब्बल मोबाइलवर छोट्या कविता लिहिणारे व त्या प्रकाशित करणारे पहिले मोबाइल कवी आहेत. त्यांनी आतापर्यंत 75 गीते लिहिली आहेत. लोकांकडून या नव्या भूमिकेचे स्वागत होईल, अशी आशा सिब्बल यांना वाटत आहे.

Next Article

Recommended