आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगजित यांच्या गझला माझ्या नसानसांत- चित्रा सिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जगजित सिंग यांच्यासोबत जगताना, गातानाचे असंख्य क्षण आठवतात. एकाच क्षणावर बोलता येणार नाही. कारण त्यांच्या गझला माझ्या नसानसांतून आजही वाहतात, अशा शब्दांत दिवंगत जगजित सिंग यांच्या पत्नी चित्रा सिंग यांनी आपल्या भावना जाहीर केल्या.
जगजित यांच्या अप्रकाशित गझलांचा अल्बम लवकरच प्रकाशित होणार आहे. या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत चित्रा यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. 1990 मध्ये मुलगा विवेकचे निधन झाले. त्यानंतर चित्रा यांनी गायन करणेच बंद केले होते. परंतु पतीचे गीत-संगीत नसानसांत आहे. या वेळी ‘द मास्टर अँड हिज मॅजिक ’ नावाचा अल्बम प्रकाशित करण्यात येणार आहे. जगजित यांचा जन्मदिन 10 ऑक्टोबर रोजी असतो. याच दिवशी हा अल्बम प्रकाशित होणार आहे.
अहमदाबादमधील त्यांच्या एका मित्राने अनेक वर्षांपासून त्यांच्या या गाण्यांचे संकलन केले होते. विविध ठिकाणी जगजित यांनी सादर केलेल्या गाण्यांतून ही गाणी वेगळी काढण्यात आली आहेत. त्यांनीच आपल्याला ती मूळ स्वरूपात दिली. त्यामुळेच हे काम होऊ शकले, अशा शब्दांत चित्रा यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा अल्बम माझ्याकडून जगजित यांना अर्पण करण्यात आला आहे. चित्रा यांनी अनेक गाण्यांत जगजित यांच्यासोबत गायन केले आहे. ही गाणी भारतातील प्रसिद्ध शायर वसीम बरेलवी, फराग रूही, गालिब यांची आहेत. जगजित यांची आणखी काही अल्बम येऊ शकतील. परंतु सध्या तरी या अल्बमवर आम्ही समाधानी आहोत. जगजित यांना मुलांची आवड होती. त्यांनी 20 गरीब मुलांची जबाबदारी घेतली होती.
आठ गाण्यांची मेजवानी - जगजित सिंग यांनी संगीतबद्ध केलेल्या आठ मूळ गाण्यांचा ‘द मास्टर अँड हिज मॅजिक’ या अल्बममध्ये समावेश आहे. अशा प्रकारच्या नवीन गाण्यांची मेजवानी जगजितच्या चाहत्यांना मिळणार आहे.
जुने लाइव्ह कार्यक्रम - जगजित यांनी 1980 व 90 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सादर केलेल्या लाइव्ह कार्यक्रमात गायलेल्या गाण्यातून ही गाणी वेगळी काढण्यात आली आहेत.