आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sisters Of Sonia Gandhi Received Money In Italy Claims Subramanyam Swamy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेलिकॉप्‍टर खरेदीप्रकरणी सोनियांच्‍या बहिणींना मिळाले पैसेः स्‍वामींचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- व्‍हीव्‍हीआयपी हेलिकॉप्‍टर खरेदीप्रकरणावरुन जनता पार्टीचे अध्‍यक्ष सुब्रमण्‍यम स्‍वामी यांनी सोनिया गांधींवर आरोप केले. सोनिया गांधींच्‍या दोन बहिणींना इटलीमध्‍ये पैसे देण्‍यात आले होते, असा दावा स्‍वामी यांनी केला. ते पाटण्‍यात पक्षाच्‍या एका कार्यक्रमात बोलत होते.

हेलिकॉप्‍टरप्रकरणी टीका करताना स्‍वामी म्‍हणाले, सोनिया गांधींच्‍या दोन बहिणी असून त्‍या इटलीत राहतात. हेलिकॉप्‍टर खरेदीमध्‍ये अनेक लोकांनी पैसे खाल्‍ले. त्‍यात सोनियांच्‍या बहिणींचाही समावेश आहे. याप्रकरणाची चौकशी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या देखरेखीखाली सीबीआयमार्फत करण्‍यात आली पाहिजे. तरच चौकशी योग्‍य प्रकारे होईल.

स्‍वामींनी गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांची स्‍तुती केली. मोदी पंतप्रधानपदासाठी योग्‍य असल्‍याचे स्‍वामी म्‍हणाले. तर राहुल गांधी बुद्धू असून काहीच कामाचे नाही, असे सांगताना स्‍वामी यांनी या आशयाचे एक चित्रही काढले. ते म्‍हणाले, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींचे गुणगान करीत असले तरीही ते काहीच कामाचे नाहीत. स्‍वामींनी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्‍यावरही कडाडून टीका केली.