आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरातील बर्फवृष्टीने तोडले १६ वर्षांचे रेकॉर्ड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काश्मीर खो-यात सुरु असलेल्या बर्फवृष्टीने गेल्या १६ वर्षातील सारे रेकॉर्ड तोडले आहेत. १९९५ नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
सोमवारीही बर्फवृष्टी सुरूच आहे. श्रीनगरसह अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुरु असल्याने जम्‍मू-श्रीनगर महामार्ग बंद आहे. श्रीनगर- मुजफ्फराबाद बस सेवाही बंद आहे. विमान वाहतुक सेवा विस्कळीत झाली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सकाळपासून सुरु असलेल्या ताज्या बर्फवृष्टीमुळे राज्यात भयंकर थंडी पसरली आहे. नळातील पाणी गोठले आहे. रस्त्यांवरून चालणे कठीण झाले असून वाहने घसरत आहेत. परीक्षांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच जम्मू-श्रीनगर राजमार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे खो-यात अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पृथ्‍वीवरचा स्‍वर्ग तुफानी बर्फवृष्‍टीमुळे झाला नरक