आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयास्पद बँक खाती 100 पटींनी वाढली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील अतिरेक्यांना पैसा पुरवण्याचा संशय असलेल्या बँक खात्यांमध्ये शंभर टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. देशात विघातक कारवाया करण्यासाठी पैसा पुरवणाºया बँक खात्यांचाही यात समावेश आहे. आर्थिक गुप्तचर यंत्रणेने आपल्या अहवालात ही बाब नमूद करून अंतर्गत सुरक्षा यंत्रणेला त्याबाबत सूचित केले आहे. अशा संशयास्पद खातेधारकांची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे.
काळ्या पैशाविरोधातील कायद्यानुसार सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांसह सहकारी तसेच इतर पतसंस्थांनी संशयास्पद भासणाºया आर्थिक व्यवहारांची माहिती आर्थिक गुप्तचर यंत्रणेला देणे आवश्यक आहे. यानुसार सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी आर्थिक गुप्तचर यंत्रणेला सादर केलेल्या अहवालानुसार 2010-11 या आर्थिक वर्षात 2009-10च्या तुलनेत संशयास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये 165 टक्के वाढ झाली. इतर आर्थिक संस्थांमध्ये याच काळात संशयास्पद व्यवहारांमध्ये 400 टक्के वाढ झाली आहे.
संशयास्पद व्यवहार
काळा पैसा विरोधी कायद्याच्या कलम 2(1)(जी) नुसार असे व्यवहार जे अधिनियमातील अनुसूचीनुसार गुन्हेगारीमार्गाने उत्पन्न असल्याचा संशय निर्माण करतात. असामान्य किंवा अनुचित परिस्थितीत झालेले व्यवहार किंवा कोणत्याही उचित कारणाशिवाय झालेले व्यवहार किंवा ज्या व्यवहारातून अतिरेकी कारवायांना पैसा पुरवल्याचा संशय निर्माण होत असेल, असे व्यवहार संशयास्पद व्यवहार ठरतात
जुगारावर नियंत्रण
कॅसिनोच्या माध्यमातून अतिरेकी कारवायांना पैसा पुरवण्याच्या कारवायांवर लक्ष ठेवण्याचा सल्लाही आर्थिक गुप्तचर यंत्रणेने सरकारला दिला आहे. कॅसिनो क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी गेमिंग रेग्युलेटरचे गठन करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. गोवा व अन्य पर्यटन स्थळांवर कॅसिनोंचा कारभार राजरोसपणे सुरू आहे. आर्थिक गुप्तचर यंत्रणेच्या कसिनो संदर्भातील समितीने कॅसिनोच्या या व्यापाराला कायद्याच्या चौकटीत बसवण्याची शिफारस सरकारकडे केली आहे.