आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून झाली शेहला मसूदची हत्‍या

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाल- सामाजिक कार्यकर्त्‍या शेहला मसूद यांच्‍या हत्‍येप्रकरणी सीबीआयने जाहिदा परवेज या महिलेला ताब्‍यात घेतले आहे. ती इंटिरियर डिझायनर असून थोडयाच वेळात तिला तिच्‍या भोपाळ येथील एमपी नगर कार्यालयात चौकशीसाठी नेण्‍यात येणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, शेहलाच्‍या हत्‍येसाठी कानपूर येथील मारेक-यांना सुपारी देण्‍यात आली होती. मारेक-यांपैकी दोघांची ओळख सीबीआयला पटली असून काही वेळातच पत्रकार परिषद बोलावून याची माहिती दिली जाऊ शकते. जाहिदा परवेजच्‍या पतीबरोबर शेहला मसूदचे अनैतिक संबंध होते, असे सांगितले जाते.
(छायाचित्र- जाहिदा परवेज यांचे फेसबुक प्रोफाईलवरून घेतलेला फोटो)
शेहला मसूद हत्या प्रकरणात तरुण विजय यांची चौकशी