आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉलिसिटर जनरल नरिमन यांचा राजीनामा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - कायदामंत्र्यांशी मतभेद झाल्यामुळे रोहिंटन नरिमन यांनी सोमवारी सॉलिसिटर जनरलपदाचा राजीनामा दिला. मात्र, पंतप्रधान आणि कायदामंत्र्यांकडे सोपवलेल्या राजीनाम्यात त्यांनी कोणतेही कारण नमूद केलेले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कायदामंत्री अश्विनकुमार यांच्याशी मतभेद झाल्यामुळे नरिमन यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले. कायदामंत्री आणि मंत्रालयाकडून नरिमन यांना काही निर्देश देण्यात आले होते. त्यामुळेही ते नाराज होते. नरिमन यांना आपण शुभेच्छा देतो, एवढीच प्रतिक्रिया अश्विनकुमार यांनी नरिमन यांच्या राजीनाम्यावर दिली आहे.

नियुक्तीवरूनही झाला होता वाद : गोपाल सुब्रमण्यम यांनी सॉलिसिटर जनरलपदाचा राजीनामा दिल्यानंतर 23 जुलै 2011 रोजी रोहिंटन नरिमन यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांच्या वतीने न्यायालयात विशेष युक्तिवाद करण्यासाठी नरिमन यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे नाराज होऊन सुब्रमण्यम यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे नरिमन यांच्या नियुक्तीवरूनही वाद निर्माण झाला होता.