आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरहद्दीवरून लष्कराने 5 घुसखोरांना पिटाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जम्मू - सरहद्दीवर शनिवारी मध्यरात्रीनंतर राजौरी भागात पाच दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला. हमीरपूर,बालकोट भागातील गली ब्रिगेड आणि राजौरी भागात पहाटे चार ते पाच लोकांच्या संशयास्पद हालचाली दिसताच लष्कराने त्या भागाला वेढा घातला. हे पाहताच दहशतवाद्यांनी झाडाझुडपांचा आश्रय घेत गोळीबार सुरू केला. जवानांनीही दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले. उभय बाजूकडून रात्रभर गोळ्यांचा वर्षाव सुरू होता. ही धुमश्चक्री सकाळी 6 वाजता थांबली. अंधार, दाटझाडी आणि डोंगराळ भागाचा फायदा घेऊन घुसखोर पसार झाले. उजाडल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली; परंतु हवामान खराब असल्यामुळे शोधमोहिमेत अडथळे येत आहेत.