आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्यदलाच्या दुचाकीस्वारांना मोडला चीनचा विक्रम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सैन्यदलाच्या दुचाकीस्वारांनी तीन नवे विक्रम नोंदवले आहेत. ‘द सिग्नल्स कोर’च्या डेअरडेव्हील संघाने जबलपूर छावणीत ही शानदार कामगिरी पार पाडली. यामध्ये जवानांनी चीनच्या नावावर असलेला ‘दुचाकीचे हँडल न पकडता सर्वाधिक अंतर कापणे’ हा विक्रमही मोडला. कॅप्टन अभयजित मेहलावत यांच्या नेतृत्वात या संघाने हा विक्रम रचला.
पहिला विक्रम : कॅप्टन मेहलावत यांनी दुचाकीचे हँडल न पकडता ओबडखाबड रस्त्यावर 16 किलोमीटर अंतर कापले. पूर्वी हा विक्रम चीनच्या लियू जिचुनच्या नावावर होता. त्याने 5.32 किलोमीटर अंतर कापले होते.
दुसरा विक्रम : दोन दुचाक्यांवर 10 जवानांनी कमी वेळात मनोरा रचून 1 किलोमीटर अवघ्या 54 सेकंदांत पार केले. पूर्वीचा विक्रम हे अंतर 1.38 मिनिटात पूर्ण करण्याचा होता.
तिसरा विक्रम : तीन दुचाकींवर 30 जवानांनी 1 किलोमीटरचे अंतर 60 सेकंदांत कापले. हा विक्रम रचण्यासाठी जवानांनी 6 महिने कसून सराव केला होता.