आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वरसम्राज्ञी’लतांवरच विशेष गाणे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावरील गीताच्या ऑडियो सीडीचा विमोचन समारंभ नुकताच येथे पार पडला. देशात पहिल्यांदाच लतादीदींवर गाणे लिहिण्यात आले आहे. भोपाळचे सुधीर एकबोटे यांनी मराठी व हिंदीमध्ये दीदींवरील ही सुमधुर गाणे लिहिले आहे.
या गीताचे लेखन, संगीतकार व संगीत नियोजक या सर्व जबाबदार्‍या एकबोटे यांनी सर्मथपणे सांभाळल्या आहेत. त्यांना अरेंजर म्हणून सुंदरेश यांची साथ मिळाली आहे. गाण्यातील शब्द, संगीत यामुळे प्रत्येक गाणे र्शवणीय बनले आहे. लता दिदींच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे वर्णन या गीतातून करण्यात आले आहे. लता आपल्या आराध्य असून अनेक वर्षांपासून आपण त्यांचे व्यक्तिमत्त्व, प्रतिभा यांना भारतीय संगीताच्या सूरांच्या कोंदणात टाकण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर साधनेचे फळ म्हणून हे गाणे तयार झाले आहे. हे गीत लता मंगेशकर यांनाच अर्पण करत आहोत, अशा शब्दांत एकबोटे यांनी भावना व्यक्त केल्या. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
या गीतापूर्वी एकबोटे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व वर्ल्ड कपवरही काही गाणी तयार केली होती. त्यांना एनडीटीव्हीने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसारित केले होते, अशी माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. एकबोटे यांची भोपाळमध्ये फेम अँडव्हर्टाझिंग नावाची जाहिरात संस्था आहे.
जाहिरात संस्थेचे संचालकपद असतानाच ते एक चांगले संगीतकार आहेत. मुंबईतील चित्रपट उद्योगात राहून त्यांनी बी ग्रेड आर्टिस्टचा दर्जा मिळवला आहे. ते केरसी लॉर्ड यांचे शिष्य आहेत. त्यांच्या नावावर 300 हून अधिक मधुर गाणी आहेत.
त्याचबरोबर त्यांची रचना असलेले झिंगल्सदेखील नभोवाणीवरून प्रसारित होतात. संगीतप्रेमी www.songonlata.com या संकेतस्थळावर जाऊन किंवा www.youtube.com/songonlata किंवा फेसबुकवर www.facebook.com/LataTai असे टाइप करून लता मंगेशकर यांच्यावरील या गीताचा आनंद घेता येईल.