आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात लोकपालला मंजूरीः सोनियांचे अण्‍णांना आश्‍वासन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कॉंग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी यांनी ज्‍येष्‍ठ समाजसेवक अण्‍णा हजारे यांना संसदेच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर करण्‍याचे आश्‍वासन दिले आहे. अण्‍णा हजारे यांनी सोनियांना यासंदर्भात पत्र लिहीले होते. त्‍याच्‍या प्रत्‍युत्तरात सोनियांनी हे आश्‍वासन दिले आहे. परंतु, अण्‍णांनी सोनियांच्‍या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवलेला नाही.

लोकपाल विधेयक राज्‍यसभेत अडकले आहे. लोकपालवर सर्वसहमती होण्यासाठी राज्यसभेत चिकित्सा समिती स्थापना करण्यात आली होती. गेल्या अधिवेशनात या समितीने अहवाल सादर केला. मात्र, लोकपालातील आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि विरोधकांमध्ये सहमती होऊ शकलेली नाही.