आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बैठकीत सोनियांचा दरारा : विरोधकांवर आक्रमक तर काँग्रेस नेत्यांना कानपिचक्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भ्रष्टाचाराच्या आरोपाने अकांठ बुडालेल्या केंद्र सरकारच्या बचावासाठी आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मैदानात उतरल्या आहेत.
पंतप्रधानांवरील आरोप निखालस खोटे असल्याचे सांगत, सोनियांनी टीम अण्णा आणि रामदेव बाबांना काँग्रेसचे शत्रू म्हटले आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांची पाठराखण केली. त्या म्हणाल्या, विरोधीपक्ष बिनबुडाचे आरोप करत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) आणि पंतप्रधानांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंकाही उपस्थित केली जाऊ शकत नाही.
सोनिया गांधींनी या बैठकीत टीम अण्णा आणि रामदेव बाबा यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांच्यावर निशाणा साधतांना त्या म्हणाल्या, ही काँग्रेस विरोधाकांची टोळी आहे. तसेच त्यांनी विरोधी पक्षांचाही समाचार घेतला. विरोधक युपीए आघाडी सरकारला सहकार्य करत नसल्याचे सांगत त्या म्हणाल्या, आर्थिक संकट ही आमच्या समोरील मोठी समस्या आहे. मात्र, त्यातूनही आम्ही नक्कीच मार्ग काढू. महागाईने सर्वसामान्यांची कंबर मोडल्याचेही त्यांनी मान्य केले. महागाई दूर करण्याचे सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभा आणि २०१४ मधील लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी या बैठकीत दिले. तसेच काँग्रेस नेत्यांनी गटबजीचे राजकारण करण्यापेक्षा पक्ष संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न केले पाहिजे, अशा कानपिचक्याही त्यांनी नेत्यांना दिल्या.
टीम अण्णाशी मतभेद : टीम मुंबईने दिली वेगळी होण्याची धमकी
पंतप्रधान अप्रामाणिक, आयपीएलमध्‍ये दाऊदचा पैसाः रामदेव बाबांचा हल्‍लाबोल
लोकशाहीची थट्टा करणा-यांना नाकारा - पंतप्रधान
...तर पंतप्रधानांविरोधातही आंदोलन, अण्णा हजारेंचा इशारा