आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांच्या पोस्टरला काळे फासले ; रामदेवबाबा, अण्णांकडून निषेध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - योगगुरू रामदेवबाबांवरील शाईहल्ल्यामुळे संतप्त झालेल्या एका व्यक्तीने सोमवारी काँग्रेस मुख्यालयाबाहेर लावलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पोस्टरला काळा पेंट फासला. रामदेवबाबा व अण्णा हजारे यांनी ही घटना लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले आहे. युवा भारत किसान पंचायतीच्या नावाखाली जमलेल्या कार्यकर्त्यांनी सोनिया, राहुल व दिग्विजयसिंहांविरुद्ध घोषणाबाजी केली.
काळा रंग फासणारा कोण ?
पोस्टरला काळे फासणा-याचे नाव त्रिभुवनसिंह सांगितले जात आहे. पोलिसांनी त्यास दुजोरा दिला नाही. आरोपीने स्वत: भगतसिंह क्रांती सेनेचा सदस्य असल्याची कबुली दिली आहे. रामदेवांचा अनुयायी असल्याचा इन्कार केला आहे.

टीम अण्णाचे सदस्य प्रशांत भुषण यांना मारहाण करणा-या भगतसिंह क्रांती सेनेचे अध्यक्ष तेजिंदरसिंह बग्गा यांनी घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.
भगतसिंह क्रांतीसेनेने या घटनेची जबाबदारी घेतली आहे.
'काळे फेकणा-याने केला होता अण्णा आणि भाजपचा प्रचार'
काळे फेकण्यामागे आरएसएसचा हात, दिग्विजय सिंग यांचा आरोप
छायाचित्रांतून पाहा - रामदेव बाबांवर कुणी टाकली शाई ?