आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींच्या आई-वडिलांनी केले होते सोनिया गांधीचे कन्यादान!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि स्वर्गिय राजीव गांधी यांच्यात अतुट मैत्री होती. हे सर्वश्रृत आहे. राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे लग्न 1968 मध्ये झाले होते. याप्रसंगी सोनिया गांधींचे कन्यादान बिग बींचे आई-वडील कवी हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांनी केले होते. विशेष म्हणजे बिग बी यांनी यावेळी सोनियांच्या वडील बंधुची भूमिका पार पाडली होती. विवाहाच्या पूर्व संध्येला सोनियांनी बिग‍ ‍बी यांच्या हातावर राखी बांधून त्यांच्याशी भावाचे नाते जोडले होते.
सोनियांचे 'मिशन मॅरेज..!'
सोनिया गांधी या 'मिशन मॅरेज'साठी इटलीहून भारतात आल्या होत्या. त्या येण्यापूर्वी राजीव गांधी यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था अमिताभ बच्चन यांच्या घरी केली होती. सोनिया गांधी बच्चन कुटूंबात एका कुटूंबातील सदस्याप्रमाणे वावरत असल्याने अल्पावधीतच त्यांनी सगळ्यांचे मने जिंकली होती. यामुळे बिग बींच्या आई-वडिलांचे मुलीचे स्वप्नही पूर्ण झाले होते. इंदिरा गांधी यांनी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विवाहाला संमती दिल्यानंतर मोठ्या थाटात त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता. बिग बिच्या आई वडिलांनी सोनियांचे कन्यादान केले होते. तर बिग बी यांनी वडिलधार्‍या भावाचे कर्तव्य पार पाडले होते.