आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाल्यानंतर महात्मा गांधी फारच दु:खी होते. तोच पाकिस्तान आज भारताच्या नाकीनऊ आणू पाहत आहे. संपूर्ण जग आज गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आठवत आहे व श्रद्धांजली वाहत आहे.
जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देणा-या महात्मा गांधी यांना 1948 मध्ये आजच्याच दिवशी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये गोळ्या घालून ठार मारण्यात आले. 30 जानेवारी 1948 हा दिवस इतर दिवसाप्रमाणे सामान्य होता. बिर्ला हाऊसमध्ये सायंकाळी 5 वाजता गांधींजीची नेहमीप्रमाणे प्रार्थना होणार होती. मात्र गांधींजी त्यावेळी सरदार पटेल यांच्याबरोबर मीटिंग बैठकीत व्यस्त होते. सायंकाळी 5.15 वाजता गांधींजीच्या लक्षात आले प्रार्थनेसाठी उशीर होत आहे. त्याचवेळी पटेलांना त्यांनी प्रार्थनेला जावू असे सांगितले. गांधींजी आभा आणि मनु यांच्या खांद्यावर हात ठेवून प्रार्थनेसाठी व्यासपीठाकडे जावू लागले. त्याचवेळी गेटवर थांबलेला नथूराम गोडसे गांधीजींच्या दिशेने पुढे येत राहिला. प्रथम त्याने गांधींजीना हात जोडत 'नमस्ते बापू!' असे म्हटले. त्याचवेळी गांधीजींसोबत असलेल्या मनुने गोडसेला म्हटले, 'भैया, सामने से हट जाओ, बापू को जाने दो।'. मात्र त्याचवेळी गोडसेने मनुला धक्का दिला व सायंकाळी 5.17 मिनिटांनी गांधीजींवर सलग तीन गोळया झाडल्या. त्यातील दोन गोळ्या गांधीजींच्या शरीरातून बाहेर पडल्या होत्या तर, एक गोळी शरीरात अडकून राहिली. गांधीजीं त्याच जागेवर ग्रतप्राण झाले. थोड्याच वेळात भारतासह जगभर गांधीजींची हत्या झाल्याची बातमी वा-यासारखी पसरली. 78 वर्षांच्या महात्मा गांधी यांचे पार्थिव बिर्ला हाऊसमध्ये कपड्याने झाकून ठेवले होते. त्याचवेळी गांधीजींचे छोटे चिरंजीव देवदास गांधी तेथे पोहचले व त्यांनी गांधीजींच्या पार्थिवावरील कपडा हटविला. त्यावेळी ते म्हणाले होते, सा-या जगाला कळू द्या की शांती आणि अहिंसेच्या पुजा-यासोबत कशी हिंसा केली आहे.
गांधीजीबाबत पुढे वाचण्यासाठी क्लिक करा....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.